आमच्या सांकेतिक स्थळावर आपले सहर्ष स्वागत
२००९ साली सामाजिक कार्य करण्याच्या हेतुने "शिवलिला ग्रामिण प्रतिष्ठाण देवराई" नावाची संस्थेची स्थापना श्री.अंकुश शिवाजीराव पालवे यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातुन सुरुवातीला आपल्या पंचक्रोशीतल अशिक्षीत लोकांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी गावोगाव कार्यक्रम घेऊ लागले. या संस्थेच्या माध्यमातुन सुरुवातीला आपल्या पंचक्रोशीतल अशिक्षित लोकांना आरोग्य,शिक्षण देण्यासाठी गावोगावी कार्यक्रम राबविले. त्यामधुन गावकऱ्यांना शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोकसहभागातुन वृक्षरोपानाचे कार्यक्रम करण्यात आले. तसेच नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना फराळ वाटप, मोहटादेवी देवस्थान येथे स्वच्छता अभियान , रक्तदान शिबीर, गावकरी व मुले यांच्या मदतीने ऎतिहासिक वास्तुंची स्वछता, जिल्हा क्रिडा अधिकारी अ.नगर यांच्या मदतीने गरिब विद्यार्थ्याना संगणक प्रशिक्षण, मौजे यॆळी येथे दुष्काळी चारा छावणी,गरीब विद्यार्थ्याना शिवण कला प्रशिक्षण वर्ग, विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन, जेष्ठ नागरीक आरोग्य तपासणी शिबीर यासारखे उपक्रम संस्थेच्या माध्यमातुन राबविण्यात आले.
संस्थेची शाळा
संस्था आलेख
पुढे वाचा