संस्था आलेख
- सन २०१० साली संस्थेच्या माध्यमातुन नर्सिग स्कुल चा प्रस्ताव टाकण्यात आला व तो आजतागायत प्रस्तावीत आहे.
- सन २०११ साली संस्थापकांनी छोट्या मुलांना सुसंस्कारी केले तर पुढची पिढी सुसंस्कारी होईल या उद्देशाने १५ जुन २०११ साली स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालयाची स्थापना तीसगाव येथे केली. पहिल्या वर्षी राहत्या घरी बालसंस्कार केंद्र सुरु केले. बालसंस्कार केंद्रात अवघे १२-१३ प्रवेश झाले परंतु दिपावली सुटटी नंतर मात्र तेच प्रवेश २०-२४ पर्यत गेले व बालसंस्कार केंद्राची प्रगती चांगल्या प्रकारे होऊ लागली. या शाळेत शिक्षक म्हणुन संस्थापक आणि त्याच्या पत्नी व एक शिक्षिका अशा या तिघांनी शाळा सुरु केली.
- सन २०१३ साली पालकांनी आग्रह केला की शाळेमध्ये १ली चे वर्ग चालु केले तर आमच्या मुलांचा तुमच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ. पालकांच्या आग्रहामुळे संस्थापकांनी शासन दरबारी मान्यता प्रस्ताव टाकला आणि २ डिसेंबर २०१३ साली शाळेला मान्यता मिळाली.
- शाळा आपल्या स्वत:च्या शेतीत पत्र्याचे शेड करुन तिथे शाळा सुरु केली. २०१३ साली शाळेत २०० विद्यार्थी प्रवेशीत झाले.
- २०१४ -१५ -१६ असे जसजसे दिवस पुढे सरकु लागले तसे शाळेवरील पालकांचा विश्वास वाढत जाउन २०१६ १७ या वर्षी ३७५ प्रवेश "स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय निंबोडी येथे झाले.
- सर्व प्रवेश जवळपासच्या देवराई,त्रिभुवनवाडी, कौडगांव,शेडाळ्, मोंडवे,तिसगाव,निवडुंगे,मढी इत्यादी गावातुन प्रवेश झाले.
- सावरगांव व शेडाळा ही गावे मात्र बीड जिल्हात येतात म्हणुन बीड जिल्ह्यातील या गावच्या पालकाच्या म्हणण्यानुसार सावरगांव,ता.आष्टी जि.बीड येथे सन २०१६ साली 'स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालय' ही शाळा सुरु करण्यात आली.त्यामुळॆ मुलांचा प्रवासाचा वेळ व खर्च या दोन्हीची बचत झाली. पहिल्याच वर्षी ४९ विद्यार्थ्याचे प्रवेश झाले.
- संस्थेने समाजसेवेच्या उपक्रमाबरोबर शाळेतही भरपुर उपक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. शाळेत वेळोवेळी पालक मेळावा घेण्यात येतो व पालकांचे सर्व दृष्टीने प्रबोधन करण्यात येते. पालक मेळाव्यात संस्थापकाच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण दिलॆ जाते.
- पुढे संस्थेला देणगी स्वरुपात रकमा मिळु लागल्या परंतु त्या रकमा करमुक्त करण्यासाठी संस्थेने आयकर विभागाकडुन ८० प्रमाणपत्र मिळवुन घेतले.
संस्थेची शाळा
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, निंबोडी |
|
स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालय, सावरगाव |
संस्था आलेख
पुढे वाचा