श्री. अंकुश शिवाजीराव पालवे
संस्थेचे अध्यक्ष
संस्थेचे अध्यक्ष श्री.अंकुश शिवाजीराव पालवे यांना त्यांच्या आई लिलावती यांच्या कडुन समाजसेवेचे बाळ्कडु मिळाले.
त्यांच्या आई या आयोग्य सेविका म्हणुन काम करत होत्या व त्या स्वत: ते काम करताना आपल्या मनापासुन करत असते व संस्थेचे अध्यक्ष हे त्यांच्या कामात मदत करत असत तसेच लहानपणीपासुनच आई बरोबर पेशंटच्या घरी जाऊन सेवा करत असत त्याचप्रमाणे ज्या वेळेस एखादी साथ रोग असेल त्या वेळेस सुध्दा ते त्यांच्या आईला मदत करत असत. पल्स पोलिओ लसिकरण करताना बाळाच्या घरी जाऊन आईला मदत करत असत.
एस.एस.सी. चे शिक्षण झाल्यावर आय.टी.आय. केले परंतु त्या कामात मन लागले नाही. पुढे ११वी व १२वी सायन्स करुन डी.एड् करण्याचा निर्णय घेतला. डि.एड् पुर्ण झाल्यानंतर पुढे नौकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयश येत गेले. परंतु पुढे जि.प. अहमदनगर येथे शिक्षकाची नौकरी मिळाली. पण मनात असलेली सेवाभावी वृत्ती शांत बसु देत नव्हती. २००९ साली सामाजिक कार्य करण्याच्या हेतुने "शिवलिला ग्रामिण प्रतिष्ठाण देवराई" नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातुन सुरुवातीला आपल्या पंचक्रोशीतल अशिक्षीत लोकांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी गावोगाव कार्यक्रम घेऊ लागले. या संस्थेच्या माध्यमातुन सुरुवातीला आपल्या पंचक्रोशीतल अशिक्षित लोकांना आरोग्य,शिक्षण देण्यासाठी गावोगावी कार्यक्रम राबविले. त्यामधुन गावकऱ्यांना शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोकसहभागातुन वृक्षरोपानाचे कार्यक्रम करण्यात आले. तसेच नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना फराळ वाटप,मोहटादेवी देवस्थान येथे स्वच्छता अभियान , रक्तदान शिबीर,गावकरी व मुले यांच्या मदतीने ऎतिहासिक वास्तुंची स्वछता,जिल्हा क्रिडा अधिकारी अ.नगर यांच्या मदतीने गरिब विद्यार्थ्याना संगणक प्रशिक्षण, मौजे यॆळी येथे दुष्काळी चारा छावणी,गरीब विद्यार्थ्याना शिवण कला प्रशिक्षण वर्ग,विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन,जेष्ठ नागरीक आरोग्य तपासणी शिबीर यासारखे उपक्रम संस्थेच्या माध्यमातुन राबविण्यात आले.
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, निंबोडी |
|
स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालय, सावरगाव |